Ladki Bahin Yojana September List: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (CM Ladki Bahin Yojana) या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस कालपासून (१० ऑक्टोबर २०२५) सुरुवात झाली आहे!
लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात (Aadhaar Linked Bank Accounts) हा मासिक सन्मान निधी ₹१,५०० जमा होईल. तुमचे पैसे आले आहेत की नाही, हे तुम्ही खालील सोप्या पद्धतीने चेक करू शकता.
सप्टेंबरचे ₹१,५०० जमा झाले का? ‘या’ पद्धतीने त्वरित चेक करा
तुमच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे ₹१,५०० जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक मार्ग वापरा:
- SMS Alert तपासा: तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला मेसेज (SMS) तपासा. ‘₹१,५०० जमा झाले’ असा मेसेज आला असल्यास, तुमचा हप्ता जमा झाला आहे.
- बँक ॲप/इंटरनेट बँकिंग: तुमच्या बँकेच्या अधिकृत अॅपवर किंवा इंटरनेट बँकिंग पोर्टलवर लॉगिन करून ट्रान्झॅक्शन हिस्ट्री (Transaction History) मध्ये जमा झालेली रक्कम तपासा.
- बँकेत जाऊन: जवळच्या बँकेच्या शाखेत किंवा ATM मध्ये जाऊन तुमच्या पासबुकवर एन्ट्री करून घ्या किंवा मिनि-स्टेटमेंट तपासा.
पुढील लाभासाठी e-KYC ची महत्त्वाची मुदत
सप्टेंबरचा हप्ता जमा होत असताना सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा नियम पुन्हा लागू केला आहे. पुढील महिन्यांपासून योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक ग्राहक ओळख) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे:
- सप्टेंबरसाठी शिथिलता: चांगली बातमी अशी की, सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होत असताना e-KYC ची अट शिथिल आहे. त्यामुळे KYC न केलेल्यांनाही सप्टेंबरचा लाभ मिळेल.
- अंतिम मुदत: सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली आहे.
- e-KYC बंधनकारक: पुढील महिन्यांपासून (म्हणजेच ऑक्टोबरपासून) योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. e-KYC न केल्यास तुमचा पुढील हप्ता थांबण्याची शक्यता आहे.
लाभार्थ्यांनी लवकरत लवकर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (ladakibahin.maharashtra.gov.in) जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
