MPSC Group C Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी जाहीर झाली आहे. आयोगाने ९३८ पदांसाठी ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५’ (MPSC Group C Services Combined Preliminary Examination 2025) ची घोषणा केली आहे.
ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे. भरतीचा तपशील, महत्त्वाच्या तारखा आणि आयोगाच्या महत्त्वपूर्ण सूचना खालीलप्रमाणे दिल्या आहेत.
भरण्यात येणाऱ्या संवर्गानुसार पदसंख्या (Total 938 Posts)
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीनुसार खालील संवर्गातील पदांची भरती केली जाईल:
पद (Post) | एकूण जागा (Total Posts) |
---|---|
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) | ८५२ |
कर सहायक (Tax Assistant) | ७३ |
उद्योग निरीक्षक (Industry Inspector) | ९ |
तांत्रिक सहायक (Technical Assistant) | ४ |
एकूण पदे | ९३८ |
भरती प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील तारखा लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
तपशील (Details) | तारीख (Date) |
---|---|
ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत | ७ ते २७ ऑक्टोबर २०२५ |
परीक्षा शुल्क (चलान) भरण्याची अंतिम मुदत | बँकेत २९ ऑक्टोबरपर्यंत चलनाची प्रत घेऊन ३० ऑक्टोबरपर्यंत शुल्क भरता येईल. |
संयुक्त पूर्वपरीक्षा दिनांक | ४ जानेवारी २०२६ |
उर्वरित पदांच्या समावेशाबाबत आयोगाची महत्त्वाची सूचना
एमपीएससीने जाहिरातीत स्पष्ट केले आहे की, भरण्यात येणाऱ्या एकूण पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
- सध्याची पदे: जाहिरातीमध्ये नमूद केलेली ९३८ पदे ही जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनाकापर्यंत आयोगाला प्राप्त झालेली मागणीपत्रे आहेत.
- अतिरिक्त पदांचा समावेश: याव्यतिरिक्त, परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
- निकाल अंतिम करेपर्यंत संधी: पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्रे प्राप्त झाल्यास, ती पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
उमेदवारांसाठी कठोर इशारा
आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्या उमेदवारांनी, जाहिरातीत पद आरक्षित नसल्यामुळे किंवा पदसंख्या कमी असल्यामुळे अर्ज सादर केला नाही, त्यांच्या निवडीची संधी वाया गेल्यास कोणतीही तक्रार नंतरच्या टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही.
याचा अर्थ: उमेदवारांनी सुरुवातीच्या जाहिरातीतील पदे पाहून अर्ज करण्याची संधी गमावू नये. पदे वाढण्याची शक्यता असल्याने, सर्व पात्र उमेदवारांनी २७ ऑक्टोबर २०२५ पूर्वी अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
